तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत विशेष कामगिरीबद्दल भूषण महालेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
![]()
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत विशेष कामगिरीबद्दल भूषण महालेंचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सलाम मुंबई फाऊंडेशन व शालेय शिक्षण विभाग यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात येत असतो. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा घोषित करण्यासाठी विशेष कामगिरी केलेल्या 15 शिक्षकांचा आज दि. 22 जानेवारी 2025 रोजी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये अमळनेर तालुक्यातून लोकमान्य विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले यांनी तालुक्यातील 100 टक्के शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. या कामगिरीबद्दल त्यांना अमळनेर तालुक्यातून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सलाम मुंबई फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक राकेश कासारे, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर, साने गुरुजी फाऊंडेशन अमळनेरचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

