निनावी पत्राद्वारे नातेवाईकाने घातला खोडा! महिला अन्याय विरोधी समितीने हा तिढा सोडवला!
1 min read

निनावी पत्राद्वारे नातेवाईकाने घातला खोडा! महिला अन्याय विरोधी समितीने हा तिढा सोडवला!

Loading

निनावी पत्राद्वारे नातेवाईकाने घातला खोडा!
महिला अन्याय विरोधी समितीने हा तिढा सोडवला!

अमळनेर प्रतिनिधी- मुलीला मांडीवर कोड आहे असे निनावी पत्र धुळे येथील वर पित्यास मिळाल्याने अमळनेर येथील तरुणीचा विवाह मोडला.. वाद विकोपास गेले पण वेळीच महिला अन्याय विरोधी समितीने सत्य शोधून काढत या वादावर पडदा टाकला. त्यामुळे दोन कुटुंबातील हा तिढा सुटला असून कोडे उलगडले!
आमच्या भाच्यालाच ही मुलगी सून म्हणून हवी अन्यथा तिचा विवाह होऊ देणार नाही या अट्टाहासाने निनावी पत्र टाकून संबंधात खोडा घालणाऱ्या व्यक्तीस अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने तात्काळ त्या साखरपुडा समारंभातच शोधून काढले.
केवळ निनावी पत्राने मुलीला साखरपुडाच्या दिवशीच नकार दिल्याने मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली होती.
कोड असलेली मुलगी वा मुलगा अशुभ असतो असा अपसमज असल्याचा गैरफायदा घेणाऱ्या नातलगाचा भांडाफोड धनंजय सोनार व सहकारींनी केला. सुदैवाने समितीचे कार्यकर्ते याच कार्यक्रमात निमंत्रित होते. त्यांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी सह पांढरे डाग या बद्दल प्रबोधन केले व मुळात पांढरे डागच नसलेल्या मुलीची अकारण बदनामी करणाऱ्या व्यक्तीस प्रसाद देऊन सर्वांसमोर माफी मागायला लावली. ऍड सारांश सोनार यांचे या प्रकरणी मार्गदर्शन लाभले.
अवघ्या 4 तासात हा तिढा सोडवुन सामाजिक आदर्श घालून देणाऱ्या महिला अन्याय विरोधी समितिचे धनंजय सोनार , निशा विसपुते, संजना बिऱ्हाडे (धुळे), मंगला विसपुते, ऍड सारांश सोनार, निवृत्त फौजदार बाळकृष्ण शिंदे, अनिल चौधरी, विनोद राऊळ यांचे दोन्ही परिवारांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *