स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन
![]()
स्नेह, उत्सह आणि शिक्षणाचा संगम: शांतीनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयांचे स्नेहसंमेलन
अमळनेर, प्रतिनिधी: येथील शांतीनिकेतन प्राथमिक आणि जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डॉ. अनिल वाणी आणि संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी होते नानासाहेब डी.डी पाटील होते.
उद्घाटन समारंभानंतर मंचावर संचालक बापूसो नंदकुमार पाटील, संचालिका प्रा. डॉ. नयना पाटील, संचालक दादासो शैलेंद्र पाटील, धनदाई कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. अनिल पाटील, संजय सोनवणे, एस आर जाधव, मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी विचारसंबंधी मनोगते व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवले. विविध कार्यक्रमांमध्ये गीत गायन, नृत्य, नाटिका यांसारखे मनोरंजनात्मक सादरीकरण झाले. खास म्हणजे, मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान प्रकल्प उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल डॉ. भाग्यश्री वानखेडे मॅडम यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी पार्थ कैलास पाटील उर्फ ओम बाबा (इ. ७ वी), हर्ष शिवाजी मोरे (इ. ५ वी) आणि सौ. माधुरी पाटील मॅडम यांनी केले.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य अनमोल ठरले.


