राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड*
![]()
*राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न समाजरत्न पुरस्कार २०२६’साठी मुरलीधर बेडगे यांची निवड*
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :
समाजसेवा, सामाजिक जनजागृती व विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मा. श्री. मुरलीधर बेडगे यांची नालंदा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत ‘समाजरत्न पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
मुरलीधर बेडगे यांनी स्वराज्य देशा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, सामाजिक जनजागृती, युवकांना प्रेरणा, शैक्षणिक व विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मा. श्री. मुरलीधर बेडगे
संस्थापक अध्यक्ष – स्वराज्य देशा, महाराष्ट्र राज्य
यांना या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठीही सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

