ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे विभाग स्तरीय अविष्कार विज्ञान प्रदर्शन संपन्न.,  विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर्थ शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रमांना प्राधान्य- कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे.
1 min read

ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे विभाग स्तरीय अविष्कार विज्ञान प्रदर्शन संपन्न., विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर्थ शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रमांना प्राधान्य- कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे.

Loading

*ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे विभाग स्तरीय अविष्कार विज्ञान प्रदर्शन संपन्न.*

*विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी समर्थ शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे:: कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे.*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्पकते कडून कृतीकडे या विचारावर आधारित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे करण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे यांनी केले.यावेळी जाईबाई सीआरसी प्रमुख, शाळेचे हामरे सर, रांजनोली भिवंडी येथील एम . एल.म्हात्रे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख, डॉ. मनिलाल शिंपी,ज्ञानमंदिर शाळेचे मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर, प्रायमरीच्या मुख्याध्यापिका सौ देशपांडे मॅडम उपस्थित होते. परीक्षक श्री कोळी, सर श्री. बन्सीलाल महाजन उपस्थित होते.
कल्याण विभागातून सहा शाळा सहभागी होत्या या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एकूण 35 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते यात एकूण 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या अविष्कार विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण करण्यासाठी विषयतज्ञ म्हणून इयत्ता सहावी व सातवी साठी श्री महाजन सर यांनी परीक्षण केले. व इयत्ता आठवी व नववी साठी श्री कोळी सर यांनी परीक्षण केले.

वरील इयत्ता सहावी ते नववी गटातील विभाग स्तरावर प्रथम आलेले नऊ गट संस्था पातळीवरील स्पर्धेसाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मल्टी टास्किंग सोलार स्टेशन, औषधी वनस्पतींचे फायदे, सेंद्रिय शेती, स्मार्ट लगेच ट्रॅव्हलर ,म्युझिकल सायन्स प्रोजेक्ट, प्रथम आत्मनिर्भर गाव, हेल्थकेअर ,इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस फ्रॉम गार्बेज अशा विविध विषयावर प्रकल्प सादर केले होते.
27 विद्यार्थी अंतिम विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरले.
या प्रदर्शनासाठी गणेश विद्यालयाचे कोळी सर व सिद्धार्थ माध्यमिक विद्यालयाचे बन्सीलाल महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अविष्कार विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या होण्यासाठी विभाग प्रमुख सौ रुपाली गुजराती यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सौ. मीनाक्षी शिर्के, सौ. प्रज्ञा अहिरे, सौ सुलक्षणा पाटील, सौ.पल्लवी परदेशी, सौ.पूजा मॅडम ,श्री वंजारी सर तसेच समाजसेवक हर्ष गुजराती व सुरज पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. रुपाली गुजराती यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे सौ पल्लवी परदेशी यांनी आभार व्यक्त केले.विभागीय अविष्कार विज्ञान प्रदर्शनासाठी सहभागी विद्यार्थी शिक्षक रुंद यांना मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख, ठाणे पालघर व नाशिक विभागाचे आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्यातर्फे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याबद्दल मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे मुख्याध्यापक श्री. महादेव क्षिरसागर यांनी विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *