बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन*
1 min read

बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन*

Loading

बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय : कवयित्री मायाताई धुप्पड यांचे प्रतिपादन

जळगांव प्रतिनिधी(विजय लुल्हे )

बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी वाचन सर्वोत्तम उपाय आहे.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यिका मायाताई धुप्पड यांनी केले.खाजगी ग्रामीण माध्यमिक शाळांच्या शालेय ग्रंथालयांना स्वलिखित ५२२०० रुपये किमतीचे प्रत्येकी १५ पुस्तकांचे ४० सेट या प्रमाणे एकूण ६०० कविता संग्रह,कथाकाव्य संग्रह व ललित प्रकारातील दर्जेदार बालसाहित्य पूज्य सासुबाई कै.शशिकला रामनारायण धुप्पड यांच्या स्मृति प्रित्यर्थ ग्रंथदान केले.याप्रसंगी प्रकल्प सहयोगी पुस्तक भिशीचे संस्थापक विजय लुल्हे उपस्थित होते.जळगाव तालुका मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण परिषद माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी महाबळ जळगाव येथे सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली.ग्रंथदानाप्रसंगी माया धुप्पड प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरला पाटील ( गटशिक्षणाधिकारी ,पंचायत समिती जळगाव ) तसेच रवींद्र चिंचोले ( ग.शि.अ.),विजय पवार ( शा.पो.आ.अधिक्षक तथा ग.शि.अ.),खलील शेख ( ग.शि.अ.), राजेंद्र खोरखेडे सर ( अध्यक्ष,जळगाव तालुका मुख्याध्यापक संघ ), नारखेडे सर ,भोळे सर ,आंबटकर सर ,बनसोडे मॅडम,सोळुंके मॅडम मान्यवर ग्रंथदाना प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी मायाताई धुप्पड लिखित प्रत्येकी एक पुस्तक सादर भेट देऊन अध्यक्ष व प्रमुख अतिथींचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.शि. वि.अ.सरला पाटील यांनाही पुस्तकांचा एक सेट धुप्पड मॅडम यांनी सादर भेट दिला.
[ *मायाताई धुप्पड यांचे ग्रंथदाना मागील उद्दिष्ट्ये*:
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी.वाचनातून अभिरुचीला योग्य दिशा म्हणून सहज संस्कार व्हावे.वाचनातून सुजाण भावी नागरिकांची पिढी निर्माण व्हावी.हा दृढ विश्वास व विशुद्ध सद्हेतू आहे.]
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या संयुक्त विद्यमाने भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांच्या सहकार्याने ‘ अनमोल पुस्तक भेट ‘ अभियान बाल साहित्यिका मायाताई धुप्पड राबवीत आहेत.९७ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे मायाताईंनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वलिखित २०० पुस्तकांचे ग्रंथदान केले.

 

 

 

 

 

 

 

 

[ *मायाताई धुप्पड यांना व साहित्याला मिळालेले मानसन्मान : -*
* महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार
* शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे एम.ए.भाग दोन अभ्यासक्रमात कविता समाविष्ठ

* बालभारती,सी.बी.एस.ई.,सुगम भारती इत्यादी विविध माध्यमांच्या पाठपुस्तकात एकूण सात बालकवितांचा समावेश
* स्वलिखित साहित्यकृतींवर ५ विद्यार्थी पी.एच.डी.करीत असून एका विद्यार्थ्याने पीएचडी प्राप्त केली आहे.
* किशोर मासिकाच्या माजी सल्लागार समिती सदस्या
* राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संमेलनाच्या अध्यक्षा, उद्घाटीका व चर्चासत्र तसेच कथा अन् कविसंमेलनाच्या अध्यक्षा, बालवाङ्मय लेखन निर्मिती कार्यशाळांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सन्मान
* ध्वनिफित ‘ मनमोर ‘ व दत्तगीतांची ध्वनिफित प्रकाशित – सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व देवकी पंडीत यांनी गीतगायन केले. ]
कार्यक्रमास मुख्याध्यापिका चारूलता पाटील, प्रणिता झांबरे , डॉ.विलास नारखेडे यांसह शहरी भागातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकही बहुसंख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *