ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन!
1 min read

ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन!

Loading

ढेकू खु येथे स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन!

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
स्व. रमेश उत्तमराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्री पंकज रमेश सोनवणे यांच्या साथीने ढेकू व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञांचा समावेश होता, जसे की डॉ. सुमित सुर्यवंशी (अस्थिरोग तज्ञ), डॉ. दिपाली साळुंखे (स्त्री रोग व त्वचा रोग तज्ञ), आणि डॉ. वैभव चौधरी (नेत्ररोग तज्ञ).
शिबिरात किरण महाजन (दुर्गा लॅंब) आणि ब्लड बँक यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला विशेष रंगत ब्लड बँकमुळे आली. गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला आणि त्यांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरात ग्राम विकास मंचचे सदस्य, ज्यामध्ये जितेंद्र सोनवणे, किरण पाटील, जयेश साळुंखे, मयुर पाटील, भुषण पाटील, संदिप पाटील, धर्मराज पाटील, सागर पाटील, सुभाष पाटील, डॉ. गिरीश पाटील, डॉ. राहुल पाटील, रोहित पाटील, प्रेम पाटील, सुनिल पाटील, विनोद पाटील, नंदकिशोर पाटील, मनोज पाटील, निलेश पाटील, योगेश पाटील, भगवान पाटील, आणि विशाल पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

 

 

 

 

रत्नप्रकाश बहुउद्देशीय संस्थेसह इतर सभासदांचे अमूल्य सहकार्य या शिबिराच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण ठरले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण आरोग्य सेवेत सुधारणा होत आहे आणि सामाजिक सहकार्य अधिक बळकट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *