अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश   स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश
1 min read

अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश

Loading

अमळनेरचा डॉ. तुषार शेलकर यांचे यश

स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश

अमळनेर प्रतिनिधी):
प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे आपण कोणत्याही आकाशाला गाठू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमळनेरच्या डॉ. तुषार राजेन्द्र शेलकर. डॉ. तुषार यांनी नुकतीच MBBS DDV स्किन स्पेशालिस्ट अँड कॉस्मोस्टॉलॉजी (त्वचारोगतज्ञ) म्हणून चिपळूण येथील नामांकित वालवलकर मेडिकल कॉलेजमध्ये यश संपादन केले आहे.
सध्या डॉ. तुषार शेलकर मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये Dermatologist म्हणून सेवा देत आहेत. ते अमळनेरचे माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर यांचे नातू आहेत, व त्यांच्या पित्या डॉ. राजेन्द्र शेलकर आणि मात्या सौ लता राजेंद्र शेलकर यांचे चिरंजीव आहेत.
वैद्यकीय शिक्षणाच्या या वारशात, त्यांचे लहान बंधू डॉ. विशाल राजेंद्र शेलकर हे हैदराबाद येथे MS Ortho अभ्यासत आहेत. त्यांचे आतेबंधू डॉ. उपलेश महाजन (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. पंकज महाजन (MD मेडिसिन), आणि डॉ. मयूर महाजन (DNB भूल रोग तज्ञ) अमळनेरमध्ये गणपती हॉस्पिटल व क्रिटीकेअर सेंटरच्या माध्यमातून सेवा देत आहेत.
डॉ. तुषार यांच्या या अद्वितीय यशाबद्दल माळी समाज आणि मित्र परिवाराकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. भविष्यकाळात, डॉ. तुषार शेलकर यांनी अमळनेरमध्ये Dermatologist व accident रुग्णालय स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना उत्तम उपचार मिळण्यास मदत होईल.
अशा युवा डॉक्टरांचे यश निश्चितच प्रेरणादायक आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *