अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश!
1 min read

अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश!

Loading

अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेत उत्कृष्ट यश!

अमळनेर (प्रतिनिधी):
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सरकारी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत मयूर रवींद्र कोळीने “अ” श्रेणी मिळवून उत्तीर्ण होण्याची उपलब्दी साधली आहे. चित्रकला परीक्षेसाठी शाळेतून एकूण ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यातील २९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
कलाशिक्षक के. व्ही. पाठक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगली कामगिरी केली. शालेय समितीचे चेअरमन हरी भिका वणी, मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी.एस. सोनजे, मुख्य लिपिक शाम पवार, शिक्षक प्रतिनिधी एस.पी. वाघ आणि अन्य शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे यशाबद्दल कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी हा एक अभिमानास्पद क्षण आहे. शुभेच्छा!ः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *