आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे*
1 min read

आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे*

Loading

*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग – विद्यापीठस्तरीय कार्यशाळेतून युवा सक्ष्मीकरणासाठी रोजगारक्षम कौशल्य विकासाचे धडे*

*प्रतिनिधी : भुषण महाजन*
आज दि. 16 जानेवारी 2025 रोजी श्रम साफल एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अंमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी रोजगारक्षम कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेतून 130 विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. उदयोन्मुख रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन युवकांनी स्वतःला सक्षम करून रोजगार प्राप्तीसाठी अद्यावत करण्याचे हेतूने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरली. संस्थेचे संस्थापक चेअरमन दादासाहेब सुभाष दोधू भांडारकर यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा.प्रा.डाॅ. संदीप नेरकर, अधिसभा सदस्य कबचौ उमवि जळगाव यांनी केले तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन मा.अभिजीत भंडारकर, प्रमुख अतिथी संजय पालकर, प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील समन्वयक प्रा.डाॅ.भरत खंडागळे व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये डॉ. संदीप नेरकर, श्री.संजय पालकर, डॉ. दत्ता ढाले धूळे व डॉ. मारुती जाधव फैजपूर यांनी रोजगारक्षम कौशल्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने सदर कार्यशाळेत करण्यात आली होती. विभागाचे संचालक डॉ.अशितोष पाटील यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आयोजकांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमधून 130 सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदवी सोबतच रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असणारी तयारी करून घेण्यात आली.
कार्यशाळेच्या समारोपसंगी श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा. डॉ. महेश पाटील, संचालीका मा.सौ.अनुरूपा भांडारकर यांनी सहभागीतांना प्रमाणपत्र वितरण केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. धनराज ढगे,प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा.जे.एस. सोनवणे, प्रा.अनिता खेडकर, प्रा.श्वेता वैद्य,प्रा.अस्मीता सरवैया, प्रा.उदय महाजन व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *