साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न  तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे
1 min read

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे

Loading

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न

तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत,कल्याण पूर्व येथील साकेत महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, सहप्रादेशिक परिवहन कार्यालय ,श्री. तिसाई ड्रायव्हिंग स्कूल कल्याण पूर्व व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत आर एस पी युनिट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान 2025 निमित्ताने पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमावर आधारित कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक श्री.प्रशांत देवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दरवर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या सगळ्यात जास्त असते. रस्त्यावर वाहन चालवताना वाहकांनी वाहनाचा किती स्पीड, ब्रेक ठेवावा.दोन वाहनात किती अंतर असावे. तसेच स्ट्रिप बेल्ट, हेल्मेट, झेब्रा क्रॉसिंग महत्व सांगितले. चालताना चुकीचा पद्धतीने रोड ओलांडू नये असे आव्हान केले. आर एस पी चे विभागीय समादेशक डॉ. मनिलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांना कडून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण राहत नाही व हेल्मेटचा वापर न करणे सीट भेट न लावणे यामुळे भयानक अपघात होत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजामध्ये वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याबाबत घराघरात जनजागृती करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.

 

 

 

या कार्यशाळेसाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती पुनम मोरे साकेत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. प्रसिना बिजू, अकॅडमी कॉर्डिनेटर,प्रा. राजश्री मुंडे, आर.एस.पी ठाणे, पालघर आणि नाशिक विभागाचे कमांडर डॉ.मनिलाल शिंपी, श्री तिसाई ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री निलेश हरिश्चंद्र गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्रीमती संचिता पांडा,प्रा.स्नेहल वेंईग उपस्थित होते.
प्रा.संजय चौधरी यांनी संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचलन व मान्यवरांचे स्वागत केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संजय चौधरी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *