मंत्र
1 min read

मंत्र

Loading

मंत्र

मकरसंक्रांतीच्या या दिनी
मंत्र ध्यानात ठेवा:
जीवन व्हावे
तिळासारखे स्नेहपूर्ण
आणि वाणी
गुळासारखी गोड!

आजच्या दिनी
संकल्प करा:
वडिलधाऱ्यांचा आदर करु.
शेजाऱ्यांना मदत करु.
अपंगांचा पाय
तर आंधळ्यांची होऊ काठी
गरीब मुलांच्या हाती
देऊ पुस्तक पाटी.

सत्याने वागू.
व्यसने त्यागू.
सन्मार्ग धरु.
सत्कार्य करु.

मकरसंक्रांतीचा
गोड दिवस आला.
तिळगूळ घ्या
गोड गोड बोला.

अनुपमा जाधव
के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू
भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *