रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….*
1 min read

रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….*

Loading

*रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….*

अमळनेर प्रतिनिधी

भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन आज दि.08/01/2025 रोजी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, विष्णापूर , ता.चोपडा येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आशिष गुजराथी, (उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, एच. डी. पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाटन माजी सैनिक, संदिप सूर्यवंशी आणि प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे , ( विभागीय समन्वयक, रासेयो विभाग,चोपडा) यांनी केले.
या वेळी विचारपीठावर प्राध्यापक डॉ. दिलीप गिऱ्हे, ( विभागीय समन्वयक, रासेयो विभाग, चोपडा) मा. एच.डी. पाटील, ( मुख्याध्यापक, प्राथमिक आश्रमशाळा, विष्णापुर ), मा. जगदीश भिल,( सरपंच, विष्णापूर ),
मा. संदीप पाटील ( ग्रामपंचायत सदस्य,), प्रा. डॉ. विनोद रायपुरे, (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), प्रा.डॉ.संबोधी देशपांडे,( कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग), प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे ( सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आलेल्या मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. विशेष ग्रामीण श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. या शिबिरांतर्गत क.ब.चौ.उ.म.वि.यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संदीप सूर्यवंशी (माजी सैनिक, विष्णापूर ), यांनी हे शिबीर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे व शिकण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. उदघाटक प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे, यांनी रासेयो स्वयंसेवकांनी शिबिराच्या माध्यमातून समाजविकास व स्वविकास साधावा असे आवाहन केले. रासेयो शिबीर हे रासेयो स्वयंसेवकांकरिता सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त करीत या माध्यमातून स्वयंसेवकांना श्रमसंस्काराचे महत्व पटेल असे मत त्यांनी व्यक्त केले. मा. एस डी पाटील सर यांनी या शिबिरा करिता सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ.पुनमताई गुजराथी, उपाध्यक्षा सौ.छायाताई गुजराथी, सचिव सौ.अश्विनीताई गुजराथी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा.डॉ. आशिष गुजराथी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारिवृंद यांनी शुभेच्छा दिल्या.
शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, मा. एच.डी. पाटील व कर्मचारिवृंद यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी पाटील या विद्यार्थिनीने केले. आभारप्रदर्शन रासेयोचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *