स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या- विजयसिंह पवार  गांधली ता.अमळनेर येथे श्रम संस्कार शिबिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
1 min read

स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या- विजयसिंह पवार गांधली ता.अमळनेर येथे श्रम संस्कार शिबिरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

Loading

स्पर्धा परीक्षेत स्वतःला झोकून द्या- विजयसिंह पवार

गांधली ता.अमळनेर येथे श्रम संस्कार शिबिरात
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

श्रव्य साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजनेने गांधली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर सविस्तर चर्चा केली.

विजयसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक टिप्स व मार्गदर्शन देऊन त्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. आर. ढगे उपस्थित होते. सूत्र संचालन अनुजा पाटील यांनी केले, तर आभार मोहिनी पाटील यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे, ज्यामुळे त्यांना स्पर्धात्मक क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यास योग्य मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *