अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्कर टोपें यांची बिनविरोध निवड.*  * अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल: सूनिताताई ब्राह्मणकर.
1 min read

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्कर टोपें यांची बिनविरोध निवड.* * अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल: सूनिताताई ब्राह्मणकर.

Loading

*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्कर टोपें यांची बिनविरोध निवड.*

* अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल: सूनिताताई ब्राह्मणकर.

 

ठाणे:( मनिलाल शिंपी)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ दिल्लीच्या अध्यक्षपदी श्री.भास्करभाऊ टोपें याची सर्वानुमते निवड करण्यात आली. अमरावतीला उजंबावाडी येथे महासंघाच्या कार्यकारिणीची सभा झाली.आयोजीत सभेसाठी विविध 18 राज्यातुन महासंघाचे प्रतीनिधी उपस्थित होते.यामध्ये महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ.एन.जी. पाथरकर.सचीव एस.एस. टोनी दिल्ली. राजपाल रोहीला दिल्ली ज्वालाप्रसाद नामदेव छत्तीसगड.महादेव खटावकर कोल्हापूर, साधुप्रसाद नामदेव मध्यप्रदेश.राॅकेश नामदेव उत्तराखंड. प्रशांत लालगे कर्नाटक. बलजीत सिंग खुरपा पंजाब.बाळासाहेब आंबेकर सातारा. ईश्वरलाल धिरडे नागपुर सुमनताई ब्राम्हणकर पुणे.महेश मांढरे पुणे. अजय फुटाणे पुणे. सुभाष मुळे पुणे. वनेश खैरनार जळगाव. रमेश भींगे गोवा,कैलास धोकटे परळी.राजु कीटे भंडारा.संतोष मुळे कडेगांव सातारा. महिला प्रतीनीधी सुमनताई ब्राम्हणकर, उषाताई पोरे,मिनल कुडाळकर,शर्मीला खांडके,भानुमती गुजरानीया अलका माळवदे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक,अंनत जांगजोड, नितीन शिरळस्कर,चंद्रकांत ताठे,दिपक जावरकर, अविनाश ताठे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण खोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सारंग गचके यांनी केले. भास्करराव टोपें यांनी अध्यक्षपद स्वीकारल्या नंतर ते म्हणाले ह्यावर्षी राष्ट्रीयअधिवेशनात एक लाख प्रतीनिधी सहभागी होणार असुन समाजातील तरुणांना व महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार असुन त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहेत. अखील भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल असा विश्वास सुमनताई ब्राम्हणकर व नासपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पुणे येथील अखील भारतीय नामदेव महासंघाचा सल्लागार सुमनताई ब्राम्हणकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *