तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड
![]()
तुलजेश पाटीलची आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत निवड
अमळनेर प्रतिनिधी
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील विद्यार्थ्यांपैकी तुलजेस दिलीप पाटील याची पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट पुरुष स्पर्धेत निवड झाली आहे. ही स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयोजित केली जात आहे. स्पर्धा 9 जानेवारी 2025 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत जय मिनेश आदिवासी विद्यापीठ, रानपुर, कोटा, राजस्थान येथे होणार आहे.
तुलजेश पाटीलच्या या निवडीबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय आबासो जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, सेक्रेटरी आबाजी देविदास बारकू पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उप प्राचार्य प्रा. व्ही.डी. पाटील, क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. डॉ. सतीश पारधी, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. जितेंद्र माळी, भाऊसो जगदीश साळुंखे, भाऊसो सचिन पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी खुशी व अभिनंदन केले आहे.
ही निवड विद्यार्थ्याच्या मेहनतीचे व कौशल्याचे प्रमाण आहे आणि या स्पर्धेत आपला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी त्याला शुभेच्छा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या.

