समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ..
1 min read

समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ..

Loading

समाजकार्य महाविद्यालय व रासेयो एककाचे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ..

अमळनेर येथील पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर राष्ट्रीय सेवा योजना एककाचे सात दिवशीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिर गांधली ता.अमळनेर या गावात दि. 6 जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन भारतीय सैन्य दलात हरिद्वार येथे कार्यरत असलेले विनोद पाटील व मा.नरेंद्र पाटील सरपंच गांधली यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुजन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष प्रा.डॉ.जगदीश सोनवणे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विजयकुमार वाघमारे, रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी अनिता खेडकर, प्रा.डॉ.सागरराज चव्हाण , प्रा.डॉ.ढगे सर, गावातील ज्येष्ठ नागरिक एम जे पाटील, रघुनाथ पाटील, प्रास्ताविक प्रा.डॉ अनिता पाटील यांनी केले,व अध्यक्षीय भाषण करत असतांना प्रा.सोनवणे म्हणाले अशाप्रकारे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व गावाच्या प्रगती सोबतच आपण आपली देखील व्यक्तिगत प्रगती करू शकतो व आपल्या नेतृत्व गुण कौशल्य विकसित करू शकतो गावातील खूप काही शिकायला मिळते व उत्तम असे संस्कार घडवले जातात असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रासेयो स्वयंसेवक सागर कोळी यांनी केले,व आभार सारंग पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *