क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——!
1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——!

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, बालिका दिवस – महिला मुक्ती दिन म्हणून साजरी ——!

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कार्यक्रमासाठी माजी गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांची सुकन्या प्रज्ञा अशोकराव शिरूडकर यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.सदर प्रसंगी प्रज्ञा शिरूडकर आणि बालक म्हणून शालेय विद्यार्थ्यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या हस्ते प्रज्ञा शिरूडकर यांचा गुलाब पुष्प , पेन – वही या वस्तू भेट देऊन स्वागत करण्यात आले. नंतर प्रज्ञा शिरूडकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पूर्ण जीवनपट आपल्या मनोगतातून आणि उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. सदर प्रसंगी पुणे येथील बुधवार पेठेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीकडून अर्थातच महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडून स्वतः शिक्षणाचे धडे गिरवत शिक्षण क्रांतीला सुरुवात केली. आणि सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा विवाह, सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा, केशवपन ,प्लेगची साथ प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य याविषयी विविध पैलूंचा उलगडा केला. तसेच समाजातील विविध अनिष्ट रूढी परंपरा वादी यांनी प्रखर विरोध करत असताना देखील आपला सामाजिक लढा सुरूच ठेवला. प्रसंगी कुटुंबातील सदस्यांनीही प्रखर विरोध केला .तरीही विरोधाला न डगमगता आपलं कार्य सुरूच ठेवले. तसेच अनंतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांचा सांभाळ करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला. त्यातीलच एक यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेऊन त्याला मोठे करून पुढे डॉक्टर केले. अशा रीतीने त्यांचं कार्य प्रज्ञा शिरूडकर यांनी सविस्तर स्पष्ट केले.
सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत तनस्वी भोई, तेजश्री धनगर, ममता भरवाड, रिया धनगर, चेतना कोळी, गायत्री गरुड, रिया धनगर, कोमल पाटील, प्रिया थोरात, भाग्यश्री जगताप, आरोही ऋषिका भिल, आरोही लोट, वैशाली अहिरे ,यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या भूमिकेत वेशभूषा करून मनोगत व्यक्त केले . तसेच सदर प्रसंगी भावेश लोहार, उदय चव्हाण, किशोर महाजन, युवराज सूर्यवंशी, भूषण लोहार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या विविध पुस्तकांचे छोटे प्रदर्शनी भरवण्यात आले होते. मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन- वही आणि एक भारतीय चलनातील नाणे प्रेरणा म्हणून प्रमुख पाहुणे संदीप पवार सर यांच्या उपस्थितीत भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपक्रमशील शिक्षिका सौ. भारती चव्हाण, अर्चना महाजन, वंदना जाधव मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले. सदर प्रसंगी उपक्रमशील शिक्षक पी.एम. ठाकरे, ए.पी .जाधव, व्ही. डी. पाटील, डी. वाय. जे. पाटील, एस. माळी सर तसेच सी.डी. निकम, एस. एस. तेले, आधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *