काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा- सिंधु सुतार*
1 min read

काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा- सिंधु सुतार*

Loading

*काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा : सिंधु सुतार*

 

काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा.स्त्रियांच्या सर्वंकष उन्नती ध्यास व सामाजिक सुरक्षेसाठी संघटित व्हा.’ असे प्रतिपादन सिंधु सुतार यांनी अध्यक्षीय भाषणात केले.चंदू अण्णा नगर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती दि.३ जाने २०२५ रोजी साजरी करण्यात आली.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान ,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

कार्यक्रमास प्रमुख अतिथी सरला वर्डीकर ( सचिव , मल्हारराव होळकर कला, ज्ञान , विज्ञान बहुउद्देशीय मंडळ ) , दिक्षा दाभाडे , माधुरी जाधव मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे अग्रपूजन व माल्यार्पण सिंधू सुतार यांनी केले.उपस्थित महिला भगिनींनी सामुदायिकपणे ‘ साऊ पेटती मशाल ‘ गौरवगीताचे गायन केले.सरला वर्डीकर यांनी सावित्रीमाईंनी केलेले शैक्षणिक कार्य सांगितले.माधुरी जाधव यांनी सावित्रीबाईंनी दुष्काळात व प्लेगच्या साथीमध्ये केलेले अनमोल कार्य सांगितले.दीक्षा दाभाडे यांनी सावित्रीबाईंनी जातीभेद निर्मूलन तसेच अंधश्रद्धा निर्मूलनार्थ राबविलेले विशेष उपक्रम संगितले.मातोश्री सिंधू सुतार यांचा वाढदिवसानिमित्त देवकाई प्रतिष्ठान तर्फे शाल,श्रीफळ देऊन अध्यक्ष सुनील दाभाडे व दीक्षा दाभाडे उभयतांनी हृद्य सत्कार केला.चिरंजीव विजय लुल्हे यांनी मातोश्री सिंधु सुतार यांचे तिलक लावून व औक्षण करून शुभाशिर्वाद घेतले.विजय लुल्हे यांनी मातेच्या वाढदिवसा प्रित्यर्थ उपस्थित सावित्रीच्या लेकींना शांता रानडे लिखित सावित्रीमाईंची चरित्रात्मक
पुस्तके सादर भेट दिली.उपस्थित महिला भगिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा केल्याने कार्यक्रम आकर्षक व संस्मरणीय झाला.सावित्रीमाईची वेशभुषा करून आलेल्या चिमुरडी कु.रेहांशी सर्वांच्या कौतुकाची विषय ठरली ! कार्यक्रमास रेखा पाटील,संगीता पाटील ,आरती मराठे , शकुंतला पाटील,मंगला पाटील यांसह कलाशिक्षक शामकांत वर्डीकर ( जिल्हाध्यक्ष , महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच , उपशाखा जळगाव ), न्हानू दाभाडे व शौर्य दाभाडे यांनी विशेष उपस्थिती दिली.सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी महात्मा ज्योतिराव फुले लिखित अखंड सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.अंकिता माळवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *