पूज्य साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय राबविणार ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम…  तालुक्यातील शाळांनी संपर्क साधण्याचे आवाहन
1 min read

पूज्य साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय राबविणार ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम… तालुक्यातील शाळांनी संपर्क साधण्याचे आवाहन

Loading

पूज्य साने गुरुजी वाचनालय व ग्रंथालय राबविणार ‘एक तास वाचण्यासाठी’ वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम…

तालुक्यातील शाळांनी संपर्क साधण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण शासन निर्णयानुसार अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये वाचन महोत्सव उपक्रम पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 15 जानेवारी2025 या कालावधीत ‘एक तास वाचनासाठी’ हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सविस्तर माहिती अशी की अलीकडच्या काळात मुलं-मुली तरुण हे वाचन संस्कृती पासून दुरावत चाललेला आढळून येत आहे यासाठी एक जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत एक तास वाटण्यासाठी असं वाचन संकल्प महाराष्ट्र चा हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अंमळनेर तालुक्यातील ज्या शाळांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी सामूहिक वाचन हे एक तासासाठी व्हावे सदर वाटण्यासाठी ग्रंथालयातून पुस्तके पुरवली जातील सदर उपक्रम आपल्या सोयीनुसार करावा व त्याचे लेखिकेचं विद्यार्थ्यांकडून तोंडी लिहून घ्यावे यातून उत्कृष्ट कथनाकास ग्रंथालय तर्फे तीन विद्यार्थ्यांना वाचन संकल्प चिन्ह दिले जाईल असे साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे अधिक माहितीसाठी 76 20 87 63 76 व 94 21 61 00 40 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *