पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.*
1 min read

पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम *खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.*

Loading

पोलीस रेझिंग डे निमित्त आदिवासी पाड्यावर अनोखा उपक्रम
*खडकपाडा पोलीस स्टेशनमार्फत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम.*

 

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलिस उपायुक्त परिमंडळ ३ मध्ये सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू केले आहेत त्यातीलच एक अनोखा उपक्रम आज दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कातकरी पाडा वाडेघर या आदिवासी पाड्यावर खडकपाडा पो. स्टे. कडून भेट दिली व तेथील लहान मुलांना एकत्र करून त्यांना व त्यांच्या पालकांना साहाय्ययक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण बाकले यांनी पोलीस रेझिंग डे बाबत माहिती दिली आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

शिक्षण घेतल्यावर आपलीच नाही तर आपल्या कुटुंबाची प्रगती होते.त्यातूनच आपल्या समाजाचीही प्रगती होते.आपल्यालाही सरकारी अधिकारी व्हायचे असेल, आमच्यासारखे पोलीस व्हायचे असेल, तर शिकावं लागतं. असं मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगण्यात आले.

पालकांनी मुलांना नेहमी शाळेत पाठवण्याबाबत सुचित करण्यात आले.त्याकरता कोणतीही मदत लागल्यास खडकपाडा पो. स्टे. शी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले .

सदर वेळी सर्व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. पहिल्यांदा पोलीस बांधवांकडून आदिवासी वस्तीत येऊन खाऊचे वाटप केल्याचा आनंद मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पालकांनीही आम्ही जास्तीत जास्त मुलांना शाळेत पाठवू व त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *