गांधली येथे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर
1 min read

गांधली येथे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर

Loading

गांधली येथे समाज कार्य महाविद्यालय अमळनेर चे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर

अमळनेर प्रतिनिधी
येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय ग्रामीण हिवाळी शिबिर गांधली येथे दिनांक सहा जानेवारी ते 12 जानेवारी 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
गांधली येथील श्री दत्त मंदिर संस्थान येथे शिबिराचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर , उद्घाटन गांधली गावचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील ,संचालक अमोल राजपूत,अनिल वाणी , पंढरीनाथ निकुंभ ,सुधाकर साळुंखे, प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे .
सात दिवस सहभागी ग्रामीण अध्ययन ,बालविवाह मुक्त भारत अभियान , मियावाकी ऑक्सिजन पार्क , व्हिटामिन ए, युथ फॉर माय भारत, श्रमदान ,विविध मान्यवरांची व्याख्याने ,विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी मेळावा असे भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे .
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे , डॉ अनिता खेडकर
प्रा उदय महाजन ,
शिबिर समन्वयक प्रा डी आर ढगे ,डॉ अस्मिता सर्वैय्या यांच्यासह डॉ सागर राज चव्हाण डॉ भरत खंडागळे डॉ.श्वेता वैद्य, योगेश संदानशिव, ईश्वर ठाकरे ,कोमल सूर्यवंशी, देवेंद्र सरदार ,रवींद्र धनगर यांचे सह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक , विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *