प्रताप*मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
1 min read

प्रताप*मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*

Loading

‘ *प्रताप*मध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील कार्यालयात आज सकाळी ११:३० वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रगीत नंतर सभा घेण्यात आली.
यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापिका, प्राध्यापक व शिक्षकेतर वृद्ध उपस्थित होते. डॉ.वंदना पाटील व प्रा. शालिनी पवार यांच्या हस्ते क्रांतीवज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, डॉ.अमित पाटील, डॉ.व्ही.बी.मांटे,डॉ.कल्पना पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
या यावेळी उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, त्यांचे विचार व कार्यांना आजच्या संदर्भात उजाळा देण्याचा प्रयत्न केले.
प्रस्तुत अभिवादन सभेच्या नियोजनात प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,डॉ.धीरज वैष्णव यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *