जी.एस.हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
1 min read

जी.एस.हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Loading

जी.एस.हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

अमळनेर(प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षिका जी. डी.ताठेदेशमुख तर प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे हे होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,पर्यावक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ,उपशिक्षिका एम.पी.भदाणे, परिविक्षाधीन शिक्षिका नंदिनी सोनवणे,पूनम शिरसाठ,नेहा महाजन,दीक्षा वाघ,हर्षदा निरे,वैशाली वाकुळीत,अश्विनी महाजन,योगिता शिंदे,प्राजक्ता शिंदे,कामिनी महाजन या उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य मांडले.यावेळी सुनील वाघमोडे,जी.डी.देशमुख तसेच मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य तसेच त्यांनी महिलांसाठी व शिक्षणासाठी केलेले कार्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी भावसार यांनी तर आभार दीक्षा वाघ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *