धरणगावात सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन !.. सावित्रीमाई फुले समस्त महिलांसाठी प्रेरणास्थान : तुळशीराम माळी
![]()
धरणगावात सावित्रीमाई जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन !..
सावित्रीमाई फुले समस्त महिलांसाठी प्रेरणास्थान : तुळशीराम माळी
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – शहरातील धरणी चौकात आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाजवळ आज ३जानेवारी धरणगाव शहरातील सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक संघटना यांच्याकडून भारतातील पहिल्या शिक्षिका – मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी यांनी केले. याप्रसंगी समाजाचे जेष्ठ नागरिक तुळशीराम बापू यांनी सावित्रीमाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य विशद केले. धरणगाव नगरीच्या माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजली विसावे, संगीता माळी, सुरेखा महाजन, प्रा. कविता महाजन यांच्या शुभहस्ते महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, विजय महाजन, कैलास माळी, गुलाब मराठे, प्रा.जितेंद्र परदेशी, विलास महाजन, राजेंद्र महाजन, गोरख देशमुख ,एच डी माळी, दशरथ महाजन, गोपाल माळी, पी डी पाटील, नितेश महाजन यासह सामाजिक – शैक्षणिक – राजकीय पत्रकारिता – पर्यावरण क्षेत्रातील सर्व समाज अध्यक्ष, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

