स्त्रियांची मानसिक गुलामगिरी संपावी हेच क्रांतीज्योती सावित्रींचे स्वप्न ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा
![]()
स्त्रियांची मानसिक गुलामगिरी संपावी हेच क्रांतीज्योती सावित्रींचे स्वप्न
ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धा
अमळनेर प्रतिनिधी-
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे स्त्रियांची मानसिक गुलामगिरी संपावी हीच क्रांतीज्योती सावित्रींचे स्वप्न होते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी सांगितले..
ते पुढे म्हणाले की १९व्या शतकात समाजात प्रचलित असलेल्या अत्याचारी समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. तर्कसंगतता आणि सत्य, समानता आणि मानवता यासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री असे त्यांनी सांगितले.
विचारपिठावर शाळेचे क्रिडा शिक्षक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद सोनटक्के
होते तर प्रमुख अतिथी आय.आर.महाजन,,एच.ओ.माळी होते.कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली..
शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. वकृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इयत्ता आठवीतील श्रेया पाटील ,अर्पिता बोरसे ,तनुश्री सोनवणे ,प्रीती पाटील, खुशी पाटील,गणेश पाटील तर इयत्ता नववी मधून शुभांगी पाटील, कांचन जाधव, निशा जाधव वैष्णवी भरत पाटील तर गीत निशा जाधव कांचन जाधव यांनी गित सादर केले.. इयत्ता दहावीतील सोनाली महाजन ,रागिणी पाटील यांनी गीत सादर केले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले.


