महिलेला व महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती
1 min read

महिलेला व महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती

Loading

महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार
स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :
महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही. आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ अशी माहिती ऍड .ललिता पाटील यांनी लैंगिक कामगार महिलांच्या स्वाधार संघ आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ऍड पाटील पुढे म्हणाल्या या महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि समाजात या महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित आहेत. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत मात्र कॅमेरे बंद आहेत ते सुरू झाले पाहिजेत.
नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमबाजी करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत असल्याने या महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी ऍड ललिता पाटील , ऍड सलीम खान , डॉ भारती पाटील , रेणु प्रसाद हजर होते.
ऍड सलीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत सांगितले की महिलेला वैयक्तिक तिच्या मर्जीने लैंगिक व्यवसाय करता येतो. न्यायालयाने त्यांचे पुनर्वसन करण्याचेही निर्देश दिले मात्र पुनर्वसन होत नाही.
प्रास्ताविक डॉ भारती पाटील यांनी केले.

आम्हालाही यातून बाहेर पडायचे आहे. पण उपजीविका कशी करायची हा प्रश्न आहे. आम्ही १८ वर्षाखालील मुली कडून व्यवसाय करून घेतो अशी शंका असेल तर केव्हांही छापा टाका. सीसीटीव्ही कॅमेरे लावा दोषी आढळलो तर अवश्य कारवाई करा पण हेतुपुरस्कर त्रास देऊ नका.- एक लैंगिक व्यवसायिक महिला
स्वाधार संघ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांची माहिती

🖤 *अमळनेर : महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही. आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ अशी माहिती ऍड ललिता पाटील यांनी लैंगिक कामगार महिलांच्या स्वाधार संघ व आधार संस्थेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.*
🩵 ऍड पाटील पुढे म्हणाल्या या महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि समाजात या महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित आहेत. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत मात्र कॅमेरे बंद आहेत ते सुरू झाले पाहिजेत. नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमबाजी करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत असल्याने या महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ऍड ललिता पाटील , ऍड सलीम खान , आधार संस्थेच्या भारती पाटील , रेणुप्रसाद हजर होते.
🩶 ऍड सलीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत सांगितले की महिलेला वैयक्तिक तिच्या मर्जीने लैंगिक व्यवसाय करता येतो. न्यायालयाने त्यांचे पुनर्वसन करण्याचेही निर्देश दिले मात्र पुनर्वसन होत नाही. प्रास्ताविक आधार संस्थेच्या भारती पाटील यांनी केले.
💙 आम्हालाही यातून बाहेर पडायचे आहे. पण उपजीविका कशी करायची हा प्रश्न आहे. आम्ही १८ वर्षाखालील मुली कडून व्यवसाय करून घेतो अशी शंका असेल तर केव्हांही छापा टाका. सीसीटीव्ही कॅमेरे लावा दोषी आढळलो तर अवश्य कारवाई करा पण हेतुपुरस्कर त्रास देऊ नका.- एक लैंगिक व्यवसायिक महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *