मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील*
1 min read

मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील*

Loading

*मराठा सेवा संघ अध्यक्ष पदी अशोक पाटील*
अमळनेर (प्रतिनिधी) :-
आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अमळनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली धनदाई महाविद्यालयातील यशवंत सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. विलास पाटील यांनी डॉ .पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची गौरवशाली माहिती विशद केली. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष शिवश्री कैलास पाटील यांनी सर्वानुमते अमळनेर तालुका नुतन कार्यकारिणीची घोषणा केली.यात शिवश्री अशोक पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी तर शिवश्री बापूराव पाटील( ठाकरे) यांची तालुका सचिव पदी , कार्याध्यक्ष पदी महेश पाटील, उपाध्यक्ष पदी निंबाजी पाटील व योगेश भदाणे शहराध्यक्ष पदी डॉ.कुणाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली.तर मराठा सेवा संघाच्या तानुबाई बिर्जे पत्रकार कक्षाचे प्रमुख म्हणून पत्रकार उमेश काटे या निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रेमराज पवार यांनी तर आभार अशोक पाटील यांनी मानले.याप्रसंगी मावळते अध्यक्ष
रामेश्वर भदाणे,प्रशांत निकम, विश्वास पाटील, श्रीकांत चिखलोदकर, विजय पाटील, हिरालाल पाटील, विनोद पाटील, खेमचंद्र पाटील, अजिंक्य चिखलोदकर, हर्षल खैरनार आदी मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *