रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम
![]()
रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम
अमळनेर: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयाची या शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षांत प्रवेशीत विद्यार्थीनी कल्याणी लांडगे व रिमझिम तोलानी यांनी रायफल शूटींग शिबिरात उत्कृष्ट प्रदर्शन केले. खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय ( स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी निशुल्क रायफल शूटींग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय शिबिरात धुळे रायफल शूटींग असोसिएशनचे प्रशिक्षक हर्षल भोळे व प्रताप महाविद्यालयाचे प्रशिक्षक दर्शन पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना रायफल शूटींग संदर्भात मार्गदर्शन केले. या शिबिरातून उत्कृष्ट फायरिंग प्रदर्शन करणारे प्रथम तीन मुले व मुली निवडण्यात आली. त्यात कल्याणी लांडगे हिला उत्कृष्ट प्रदर्शनासह मुलींमध्ये प्रथम क्रमांकाचे व रिमझिम तोलानी हीला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रताप महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल, RUSA व IQAC समन्वयक प्रा. डॉ. मुकेश भोळे यांच्या हस्ते देण्यात आले.
दोघी विद्यार्थीनीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन योगेश जी. मुंदडे, खा. शि. मंडळाचे चिटणीस प्रा. डॉ. अरुण जैन, प्राचार्य डॉ, प्रा.रविंद्र सोनवणे, प्रा. रविंद्र माळी, प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले.

