*प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड*
![]()
*’प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड*
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील करियर कौन्सिलिंग सेंटर चा विद्यार्थी तथा राज्यशास्त्र विषयातील एम ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सागर एकनाथ चौधरी यांची मुंबई हायकोर्ट मध्ये शिपाई या पदावर नुकतीच निवड झाली आहे.सागर चौधरी हा जैतपीर या गावचा रहिवासी असून अतिशय कष्टाने त्याने सीसीएमसी विभागात अध्ययन करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे. दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या निकालात सागर चौधरी यांची निवड झाल्याचे मेरीट यादीनुसार निदर्शनास आले आहे. त्याच्या या निवडीबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ.अरुण जैन,सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव,उपप्राचार्य पराग पाटील,प्रा.सी बी सूर्यवंशी,करीअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,डॉ.व्ही बी मांटे,डॉ.कल्पना पाटील, डॉ.तोरवणे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.आर सी सरवदे, डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर,प्रा.विजय साळुंखे,डॉ.बालाजी कांबळे, कुलसचिव राकेश निळे,यांच्यासह अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे तसेच सीसीएमसी विभागाचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील,विशाल अहिरे ,हिमांशू गोसावी यांनी सुद्धा सागर चौधरीचे अभिनंदन व कौतुक केले आहे,या यशाबद्दल सागरचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे

