छगन भुजबळ समर्थकांकडून पाथर्डी महात्मा फुले समता परिषद कडून महायुतीचा निषेध
1 min read

छगन भुजबळ समर्थकांकडून पाथर्डी महात्मा फुले समता परिषद कडून महायुतीचा निषेध

Loading

नाशिक प्रतिनिधी

छगन भुजबळ समर्थकांकडून महायुतीचा निषेध,पाथर्डी महात्मा फुले समता परिषद कडुन ओबीसी चे नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्री मंडळात स्थान न दिल्याने येथील नाईक चौकात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, या वेळी किसन आव्हाड, रावसाहेब सोनटक्के, राहुल डोमकावळे, गोरक्ष ढाकणे, दिपक लगड, उत्तम सोनटक्के, मोहन सोनटक्के, मंजाबापु हंडाळ, देविदास शिंदे, रघुनाय भडके आदि उपस्थित होते, या वेळी पदाधिकारी रमेश गोरे म्हणाले की महायुती सरकारने मंत्रीमंडळ विस्तारात जाणीव पुर्वक छगन भुजबळ यांना डावलले, त्यामुळे राज्यात ओबीसी त अ संतोषाची भावना निर्माण झाली आहे, जेष्ठ नेत्याचा या सरकारने अपमान केला, याचा बदला समता परिषद व ओबीसी कडून निश्चित दाखवला जाईल, छगन भुजबळ ओबीसी च्या मागे भक्कम उभे आहेत हे काम कौतुकास्पद असताना महायुती सरकारला ते योग्य वाटत नसल्यानेच त्यांना डावलल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *