मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन कीटचे वाटप.*
1 min read

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन कीटचे वाटप.*

Loading

*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन कीटचे वाटप.*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून स्व.अनंतराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गावदेवी मंदिर अंजूर येथे दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. त्याचा गावातील अनेक दिव्यांग तसेच गरीब गरजू लोकांनी लाभ घेतला.सदर कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतीलाल शिंपी साहेब, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, उद्योगपती डॉ. रामचंद्र शांताराम देसले,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे,भिवंडी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री. सोमनाथ ठाकरे बाजार समितीचे माजी उप सभापती श्री गणपत म्हणेरा माजी सरपंच मनीष तरे,सरपंच सौ. छाया जनाठे, सदस्या योगिता भोईर, सदस्य हरेश नाईक, किशोर मढवी , पोलिस पाटील रोशन नाईक स्वामी एंटर प्रायझेसचे प्रौप्रा.संतोष स्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. यशवंत म्हात्रे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.ग्राम पंचायतीच्या वतीने उपस्थित अतिथी गणांचे स्वागत आणि सत्कार केला,आणि संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मानवसेवा हिच ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नेते गणपत म्हणेरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या साठी ग्राम पंचायतीच्या माजी उपसरपंच तथा सदस्या सौ.नयना म्हणेरा आणि बाजार समितीचे संचालक श्री.मोहन म्हणेरा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *