राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*
1 min read

राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

Loading

*राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करून निर्णय घेण्यात यावी यासाठी शिक्षण सहसंचालक पानझडे यांच्याशी चर्चा .*

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याकरीता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे भेट देऊन शिक्षण सहसंचालक मा. पानझडे साहेब यांची भेट घेऊन राज्यातील शिक्षकांच्या असलेल्या शैक्षणिक समस्यांबाबत चर्चा केली, खालील बाबी तात्काळ सोडवण्यासाठी सूचना दिल्या यामध्ये प्रामुख्याने अघोषित शाळांची यादी पुढील 10 दिवसात जाहिर होणारअसेही नमूद करण्यात आले आहे.2024-25 ची संच मान्यतेचे काम सुरू आहे. वाढीव टप्पा अनुदानाची व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांची माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागितली आहे ती मंजूर करून अनुदान मंजूर केले जातील,विना अनुदानावरून 100% अनुदानावर बदलीचे प्रस्ताव तात्काळ राज्य शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या. उच्च माध्यमिक वाढीव पदावरील उरलेल्या शिक्षकांची माहिती शासनास सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर समायोजनाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवून मग समायोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच टप्प्यावरील शिक्षकांचे समायोजन सुद्धा करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. संच मान्यता दुरुस्ती तात्काळ कराव्यात त्यांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. तसेच तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना रजा कालावधी टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.
अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा केली व राज्यातील आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यात आले.
सोबत संस्थाचालक संघटनेचे सचिव महेंद्र पाटील, व गजानन पाटील, प्रमोद विचवे, हनुमंत भगत अन्य शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *