चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळा पारोळा येथे समाजसेवेचा अनोखा उपक्रम
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळा पारोळा येथे समाजसेवेचा अनोखा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
पारोळा येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात, विशेष मुलांसाठी आयोजित केलेल्या एक अनोख्या उपक्रमामुळे शाळेतील शालेय जीवनात एक नवा आनंद अधिक झाला. उद्योजक श्री विकास एकनाथ शिरोळे यांच्या चिरंजीव श्री तेजस विकास शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त, विशेष मुलांना स्वेटर आणि किरकोळ किराणाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम एकत्रितपणे समाजसेवक श्री. विनोद धोत्रे आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
शाळेतील विशेष मुलांच्या शालेय जीवनामध्ये आनंद व रंग भरायला सदरचा उपक्रम महत्त्वाचा ठरला. पारोळा स्थित चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचालित निवासी शाळेने समाजसेवेच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले. श्री तेजस शिरोळे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये, त्यांनी विशेष मुलांना स्वेटर व किरकोळ किराणाचे वाटप केले.
सदर उपक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांचे मार्गदर्शन व शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांच्या उत्साहवर्धक उपस्थितीने सर्वत्र आनंदाचा समारंभ उभा केला. उपमुख्याध्यापक हेमंत महाजन यांच्या सहकार्याने श्री तेजस भाऊ यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालनाचे उत्तरदायित्व जगदीश सोनवणे सर यांनी सफलपणे पार केले.
हेमंत महाजन सरांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

