अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न
![]()
अमळनेरला अंब ऋषी टेकडीवर 22 फुटी श्रीराम भक्त हनुमान मूर्ती आणि ओपन जिम चे उद्घाटन संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री प्रल्हाद बाविस्कर व माजी नगरसेविका सौ लक्ष्मीबाई बाविस्कर यांच्या आशीर्वादाने यांचे सुपुत्र श्री संजय बाविस्कर, विजय बाविस्कर यांच्या दातृत्वाने अंबऋषी टेकडीवर 22 फुटी श्री श्रीराम भक्त हनुमानाची मूर्ती मूर्ती विराजमान झाली दूर दूरचे भाविक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. आता आणखी अंबऋषी टेकडीवर सर्व जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून ओपन जिम उभारण्यात आली. त्याचे नुकतेच उद्घाघाटन माजी नगराध्यक्ष व पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते व मोती काका जैन,श्री. हेमंत पाठक, श्री भदाणे व सौ भदाने, दिलीप सोनवणे, डॉक्टर राजेंद्र पिंगळे, डॉक्टर राजेंद्र सोनार यांच्या शुभहस्ते करून श्री संजय बाविस्कर सौ अश्विनी बाविस्कर यांनी जनतेस अर्पण केले .जिमच्या साहीत्याची पूजा विधी श्री.बनतोडे महाराज यांनी केली याप्रसंगी सुभाष चौधरी डॉक्टर राजेंद्र पिंगळे हेमंत पाठक दिलीप सोनवणे यांनी भाषणे केली बाविस्कर परिवाराच्या दातृत्वाचे सर्वांनी अमळनेरच्या जनतेतर्फे कौतुकच केले व इतरांनी सुद्धा त्यांच्या आदर्श घ्यावा असे आवाहन केले. अनेक दातांच्या देणगीतून अंबऋषी टेकडी मानवनिर्मित जंगल उभे राहिले आहे. शेकडो लोक त्या ठिकाणी फिरावयास व शुद्ध ऑक्सिजनचा लाभ घेतात. बाविस्कर परिवाराने आणखी आम्ही अंब ऋषी टेकडी ग्रुपच्या व जनतेच्या सूचनेप्रमाणे सुशोभीकरण करू असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमा साठी श्री.लोटन पाटील,श्री सतिष देशमुख, श्री.धिरज चांदवाणी आणी श्री.अंबर्षि टेकडी वृक्ष संवर्धन गृपचे सदस्य श्री.नरेश कांबळे.रमेश कंजर.भावसार सर, गौरव चौधरी,भरत सैंदाणे, सुरेश भावसार,आशिष चौधरी, योगेश येवले ,संजय पाटील,गणेश पाटील,विनोद थोरात.हेंमत महाले,दिपक मोरे,राजु मोरे इ.कार्यकर्त्यानी परीश्रम घेतले.

