प्रेरणादायी बातमी,  प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जितेंद्र अहिरे मुंबईला जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड
1 min read

प्रेरणादायी बातमी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जितेंद्र अहिरे मुंबईला जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड

Loading

प्रेरणादायी बातमी..

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जितेंद्र अहिरे मुंबईला जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आयुष्यात अपयशाची ठोकर खाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जितेंद्र निंबा अहिरे. अमळनेरच्या पैलाड येथील या विद्यार्थ्याने आपल्या कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश नोंदवले आहे. घराला मदत करणाऱ्या आणि अनेक विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आदर्श ठरलेल्या जितेंद्रची कथा अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे.
जितेंद्रची शिक्षणाची गाडी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयात सुरू झाली. त्या ठिकाणी त्याला एक दिशा मिळाली. ती पण स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार सर यांच्या माध्यमातून.. सुरुवातीला त्याचा अभ्यास दिशाहीन होता, पण शिक्षक पवार सरांच्या मार्गदर्शनाने त्याला योग्य दिशेचा अभ्यास केला. कॉलेजमधील अध्ययनाने त्याला अपयशावर मात करण्याची आणि ध्येय गाठण्याची प्रेरणा दिली.
यशाच्या प्रवासात जितेंद्रला अनेक वेळा अपयशाला सामोरे जावं लागलं. त्याने हे लक्षात आलं की संघर्ष हे यशाचे एक अपरिहार्य अंग आहे. त्याची आई, जी मेहनत मजुरी करून त्याला शिक्षणाची प्रेरणा देते, तिच्या आर्थीक मदतीने त्याने काम केले. त्याचा भाऊ सुद्धा त्याला आर्थिक पाठबळ देण्यात कधी कमी पडला नाही. जितेंद्रच्या यशामागील त्याच्या कुटुंबातले प्रत्येक सदस्य आणि मित्रांचा मोलाचा वाटा आहे. मित्रांमुळे त्याला लागणारी प्रेरणा मिळाली. अमोल मोरे, नितीन मोरे, गोपाल घाटे, राहुल पाटील, दानेश सोनार आणि रोहित कंखरे यांसारख्या मित्रांनी नेहमी त्याच्या सोबतीला उभे राहण्याचा प्रयत्न केला.
सध्या जितेंद्रने नुकतीच मुंबईच्या जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड झाली आहे. हे यश त्याच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे आणि याचे श्रेय त्याच्या कुटुंब, मार्गदर्शक आणि मित्रांना देतो. त्याने जेव्हा त्याचा जीवनपट सांगितला तेव्हा सत्कार समारंभात सर्व मान्यवर विद्यार्थी यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले..
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात त्याचा आईसह शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्या सत्कार प्रसंगी मान्यवर स्पर्धा परीक्षा संचालक संचालक विजयसिंह पवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दिनेश निघोट, संदीप पाटील,चव्हाण भाऊसाहेब,पत्रकार ईश्वर महाजन,यांनी मनोगतात सांगितले कि जितेंद्र अहिरेची कथा एक प्रेरणादायक साक्षीदार आहे की, जर आपल्या मनात जिद्द , आत्मविश्वास असेल कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही. जितेद्रच्या यशाने सिद्ध केले की मेहनत आणि समर्पणाचे फळ निश्चितपणे मिळते. सर्व विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचा धडा आहे की अपयशाने खचलो नाही, तर त्या अपयशातून शिकून आपल्या ध्येयाकडे पुढे जावे असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *