स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भोजनाचे आयोजन
1 min read

स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भोजनाचे आयोजन

Loading

स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोड भोजनाचे आयोजन

जळगाव, दि. 7 डिसेंबर 2024 – आज शनिवारी, शासकीय अपंग संमिश्र केंद्र, सिंधी कॉलनी जळगाव येथे अनुदानित आदिवासी आश्रम शाळा डोमगाव ता. जि. जळगाव येथील पदवीधर शिक्षक श्री किशोर पाटील सर यांच्या आई स्व. मीनाक्षी पंढरीनाथ पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय मीनल मॅडम यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गणेश पाटील आणि श्री म्हात्रे साहेब अलिबाग उपस्थित होते. कार्यक्रमात गावातील अनेक मान्यवरांनी भाग घेतला. श्री मनोज पाटील, श्री किशोर पाटील, श्री सोमनाथ पाटील, श्री अजय पाटील, पद्माकर चौधरी, जितेंद्र पाटील, विश्वेश चव्हाण, दिगंबर पाटील, बद्री प्रसाद चौधरी, तापीराम हिवराळे, प्रभाकर मोरे, अक्षय महाजन, रमजान तडवी, हिम्मतराव पवार, निर्मला पवार, मीनाक्षी झांबरे, हर्षाली पाटील, आणि सृष्टी पाटील हे या खास प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शासकीय दिव्यांग अपंग संमिश्र केंद्रातील अंध, मतिमंद आणि गतिमंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांनी श्री किशोर पाटील सर यांच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना वरण भात, वांग्याची भाजी, आणि सोनपापडी चं गोड जेवण देण्यात आले. किशोर पाटील सर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सर्व विद्यार्थ्याना आपुलकीने जेवण वाढले.

किशोर पाटील सर यांचा वाढदिवस नेहमी गरजू लोकांना रक्तदान किंवा अन्नदान करून साजरा करण्याचा गुण आहे, ज्यामुळे त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम नेहमीच प्रेरणादायी असतात, आणि यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आशा आणि आधार मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *