नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम  अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता
1 min read

नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता

Loading

नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम

अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जागतिक एड्स दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत एक नव्या उद्देशाला गाठून अमळनेर शहरात आय.सी.टी.सी. व ए.आर.टी विभाग ग्रामीण रुग्णालयामध्ये जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालये, आणि सामाजिक संस्थांचे एकत्रित योगदान पाहायला मिळाले.

यामध्ये शासकीय रुग्णालय व अमळनेर शहरातील साने गुरुजी बहुउद्देशीय संस्था आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रशिक्षणार्थी देखील सक्रियपणे सहभागी झाले. डॉ. प्रकाश ताळे (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अमळनेर) आणि API श्री. पाटील (मारवाड पोलीस स्टेशन) यांनाही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
अमळनेर शहरातील विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय तज्ञांनी या मोहिमेला प्रोत्साहित केले. डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. भुषण पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. जयेश शिंदे यांच्यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचं योगदान अनमोल ठरलं.

लिंक वर्कर दीप्ती पाटील, आरती मोरे, आणि समुपदेशक अश्वमेध पाटील पाटील यांच्या मेहनतीमुळे, या कार्यक्रमाला यश मिळाले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे आणि ए.आर.टी विभागातील कर्मचारी रुंद यांनीही महत्त्वपूर्ण समर्थन केले.
या मोहिमेमध्ये जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यास मदत मिळाली आहे आणि एचआयव्ही/एड्सच्या समजण्यास मदत केली आहे, त्यामुळे हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *