साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!!
![]()
साहित्यिकाला विचार करायला भाग पाडणारी माय बहिणाबाई !!!
महाराष्ट्रात साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. अशा परंपरेत काही प्रतिभा संपन्न असलेले काही लोक जे न शिकता ही जीवनावर भाष्य करू शकली. अशा प्रगल्भ साहित्यिक लोकात बहिणाबाई ही आघाडीवर आहे. असोदा नावाच्या एका मोठ्या लोक संख्येने असलेल्या गावात बहिणाबाईंचा जन्म झाला. तो दिवस होता २४ ऑगस्ट१८८० चा ज्या दिवशी जीवनाच्या बहुतेक पैलवर भाष्य करणारी एक भावनाप्रधान, सत्यता मांडणारी, संघर्षातून प्रेरणा घेणारी, प्रतिभा संपन्न कवियत्री ग्रामीण खेड्यात जन्माला आली. खेड्यातील जीवन, संस्कृती, परंपरा त्यामागील सत्य बहिणाबाईंनी आपल्या कवितेत मांडलेले आहे. लहानपणापासून बहिणाबाईला गावामध्ये चालणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेने, विचाराने मोहित केले. गावात होणारे अनेक कीर्तने, भागवत सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गीता पारायण, भजने, ओव्या, भारुडे, अभंग यांचा सकारात्मक परिणाम बहिणाबाईच्या जीवनावर दिसून येतो. माय बहिणाबाई ही कर्मठ महिला नव्हती. संत साहित्यातून बहिणाबाईंनी प्रेरणा घेतली. असोदा गावामध्ये खानदेश चे भूषण संत झेंडूजी महाराज यांच्या कीर्तनाचा चांगला प्रभाव बहिणाबाईच्या जीवनावर झाला. अनेक संत साहित्याचा अभ्यास असलेले कीर्तनकार असोदा या गावात येत असत. नेहमी होणारे धार्मिक सप्ताह त्यातून खरं तत्त्वज्ञान बहिणाबाईंनी घेतले. चांगल्या कृतीला भक्ती मानले.. असोदा गावात वडील उखाजी महाजन यांचा वैचारिक दबदबा होता. ते परिस्थितीने चांगले होते. बहिणाबाईची आई भिमाबाई विचारी गृहिणी होती. शेतातील सर्व कामे ती करायची. बहिणाबाई ला शेतातील सर्व कामे येत असत कारण आई-वडिलांसोबत शेतात काम करण्याची सवय तिला झालेली होती. शेतात काम करताना ती अभंग, भजने, ओव्या गात असे. नियमित मंदिरात जाण्याचे आवड बहिणाबाईला होती. घरामध्ये वारकरी परंपरा होती. पंढरपूरचा विठू त्यांचा दैवत होता. बहुजनासाठी निर्माण झालेला वारकरी संप्रदाय हा विचाराचा स्रोत होता. संतांचे चिकित्सक, विवेकी विचार बहिणाबाईंनी जीवनात उतरविले. बहिणाबाईंच्या साहित्यात लेवा बोली तसेच खानदेशातील बोलींचा प्रभाव होता. शेतीत काम करून पोट भरणे हाच बहुजनांचा उद्देश होता. बहिणाबाई ने केवळ शेतीत काम केले नाही तर जीवनाचे तत्त्वज्ञान जगाला दिले.
बहिणाबाईला तीन अपत्ते झाली. त्यातील सोपान चौधरी यांनी आपल्या आईच्या कविता वहीमध्ये लिहून काढल्या. महाराष्ट्रातील थोर पत्रकार ,साहित्यिक प्र.के. अत्रे यांना बहिणाबाई गायलेल्या गाण्यांची वही दाखवून. त्यातील कविता कवी अत्रे यांनी वाचल्या. प्र.के. अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितेला अस्सल सोनं असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नाने बहिणाबाईंच्या कविता उजेडात आल्या. बहिणाबाईंचा निर्मिकावर विश्वास होता परंतु भोंदुगिरीवर त्यांनी ताशेरे ओढलेले आहे. त्या खऱ्या अर्थाने वारकरी होत्या. बहिणाबाईंनी अनेक वाईट रीतीवर प्रहार केलेले आहे. श्रद्धाळू होत्या पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. आपल्या मिळालेल्या सासरच्या लोकांची परिस्थिती बेताची होती तरीही परिस्थितीला दोष देता सकारात्मक पद्धतीने जीवन जगून एक मोठा आदर्श त्यांनी खानदेश ला तर सर्व जनतेला घालून दिलेला आहे . मोठमोठ्या मोठ्या साहित्यिकाला लिहिता येणार नाही अशा कविता बहिणाबाईंनी गायलेले आहे. स्वतः कवणे रचलेली आहेत. माणसाने कसं जगावं याचं अनमोल तत्वज्ञान त्यांनी मांडलेले आहे. आज चुकीच्या , स्वार्थी,लोभी,भोंदू महाराजांच्या नांदी लागलेल्या लोकांनी बहिणाबाईंचा आदर्श घेतला पाहिजे. भोंदू महाराज जनतेकडून कोट्यावधी पैसा घेऊन आलिशान घरात राहून, सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांचा लाभ घेऊन, चमचमीत खाऊन लोकांना दान करण्याचे, भक्ती करण्याचे, दक्षिणा देण्याचे, चमत्कार सांगून कर्मापासून पळून जाण्याचे खोटे विचार सांगतात.लोकांची दिशाभूल करतात. बहिणाबाईंनी संतांचे विचार समाजाला दिलेले आहे. आज बहिणाबाईंचा स्मृतिदिन त्यानिमित्त बहिणाबाईंना विनम्र अभिवादन
पत्रकार
एस.एच.भवरे

