दहिवद येथे भर दिवसा घरपोडी…  पाच घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला  चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान
1 min read

दहिवद येथे भर दिवसा घरपोडी… पाच घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान

Loading

दहिवद येथे भर दिवसा घरपोडी…

पाच घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला

चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दहिवद येथे पाच घर फोडीतून चोरट्यांनी 7 लाख 19 हजार चा ऐवज लपवला .दहिवद येथे चोरट्यांनी भर दिवसा पाच घरांचे कुलूप उघडून 7 लाख 19 हजार दोनशे रुपये सोन्याचे दागिने चोरून नेली ही घटना 26 नोव्हेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली..
सविस्तर माहिती अशी की केतन माळी हे 26 रोजी सकाळी आठ वाजता शेतात कामाला निघून गेले होते.. त्यांच्या घराची चावी बाहेर एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेली होती.. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले व घरातील कोठीत ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्याप्रमाणे गावातील आणखी चार घरे उघडून त्यांनी चोऱ्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलिसांनी पथक व ठसे तज्ञांचा भेट दिली. याप्रकरणी केतन माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*चोरट्यांनी खालील घरांमधून मुद्देमाल लंपवला*
केतन माळी यांच्या घरातून 3 लाख 25 हजार रोख, 63 हजारांचे विविध दागिने असे एकूण 3 लाख 95 हजारांचा ऐवज लांबवला..
हरिलाल माळी यांच्या घरातून 50 हजार रोख, 84 हजार सोन्याचे दागिने, 3600 रूपांयाच्या चांदीच्या वस्तू असा 1 लाख 37 हजार चा ऐवज लंपवला.
राजेंद्र पाटील यांच्या घरातून 1 लाख 71हजार च्या सोन्याच्या विविध वस्तू चोरून नेल्या ..
अविनाश माळी यांच्या घरातून 6 हजाराचे दागिने
राजेंद्र पाटील यांच्या घरातून 8 हजार रुपये रोख.
असे एकूण 7 लाख 19200 रुपयांचा मार्च चोरीस गेला आहे..
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,हवालदार संदेश पाटील ,उज्वल मस्के, प्रशांत पाटील, एलसीबी चे संदीप पाटील, राहुल कोळी तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांनी भेटी देऊन पंचनामा केला. याबाबत केतन माळी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तपास करीत आहे
पोलिसांपुढे एक मोठे आव्हान झाले आहे.. अमळनेर तालुक्यामध्ये सध्या भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे.. पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडून बंदोबस्त करावा ग्रामीण व शहरी भागांमध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..

 

चौकट
मागील घरफोड्या तसेच शेतकऱ्यांचे विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप मोटारी चोरीस गेलेल्या आहेत , याचाही शोध पोलिस अद्याप करू शकले नाहीत. जर चोरी अवैध धंदे यावर जर नियंत्रण पोलिसांना करता आले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर गावकरी मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारतील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी..

सौ सुषमाताई वासुदेव देसले
मा. लोकनियुक्त सरपंच दहिवद ता.अमळनेर तथा संचालक- कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *