अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन
1 min read

अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन

Loading

अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन

जळगांव विशेष प्रतिनिधी-(विजय लुल्हे)

सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ रोजी नक्षत्र लॉन्स ( राजमाता अहिल्यामाई होळकर अधिवेशन नगरी ) बुरुडगाव रोड अहिल्यानगर येथे संपन्न होत आहे.
शाक्त शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष,राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जयंती महोत्सवी वर्ष, राजर्षी सत्यशोधक शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष,सत्यशोधक प्राचविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी व सत्यशोधक चळवळीचे साहित्यिक जी.ए.उगले यांच्या स्मृतीनिमित्त या संमेलनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
*कार्यक्रम पत्रिका* शनिवार दि .३० नोव्हेंबर २०२४
* *उद्घाटन सत्र*: दुपारी १२.३० ते २.०० वाजेपर्यंत सत्यशोधक समाजाच्या ध्वजारोहणाने अधिवेशनाचे उद्घाटन होईल.स्वागताध्यक्ष मा.उत्तमराव पाटील, तरवडी – नेवासा ( दीनमित्र वृत्तपत्राचे संपादक मुकुंदराव पाटील यांचे नातू )
उद्घाटक : मा.प्रवीणदादा गायकवाड ( प्रदेशाध्यक्ष , संभाजी ब्रिगेड )
भूमिका : अरविंद खैरनार (अध्यक्ष , सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य )
प्रमुख पाहुणे : मा.डॉ.संजीव सोनवणे ( कुलगुरू , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक ), मा.डॉ.ज्ञानेश्वर गोरे ( संचालक सत्यशोधक विद्यापीठ , यवतमाळ ), मा.डॉ.प्रकाश हसनाळकर ( पशुसंवर्धन अधिकारी,पालघर ), मा.डॉ. अशोक चोपडे ( सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष, वर्धा ) सूत्रसंचालन – सचिन झगडे प्रास्ताविक ज्ञानदेव खराडे ,आभार डॉ.सुधाकर शेलार करतील.
सत्र पहिले :- दुपारी ३ ते ५
विषय : भारतीय लोकशाही आणि सत्यशोधक तत्वज्ञान
अध्यक्ष : मा.डॉ.प्रल्हाद लुलेकर वक्ते : – प्रा.डॉ.सुभाष वारे ( पुणे ), प्रा. अनंत राऊत ( नांदेड ) ,ॲड.संभाजी बोरुडे ( श्रीगोंदा ), सुत्र संचालन – आनंदा गांगुर्डे ( बारामती ), प्रास्ताविक – प्रदिप कांबळे ( रत्नागिरी ) , आभार – प्रमोद पाटील ( जळगाव )
सत्र दुसरे :- सायंकाळी ५ ते ७ विषय : – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अपेक्षा आणि वास्तव अध्यक्ष – डॉ.उमेश बगाडे ( छत्रपती संभाजी नगर ) वक्ते :- डॉ. सुभाष वाघमारे ( सातारा ), उत्तरेश्वर मोहोळकर ( श्रीगोंदा ), डॉ. प्रभाकर गायकवाड ( छत्रपती संभाजी नगर ) सुत्रसंचालन अशोक नेवसे ( कर्जत ), प्रास्ताविक प्राचार्य संजय नगरकर ( कर्जत ), आभार महेंद्र जळगावकर
( रत्नागिरी ) भोजनावकाश : रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत
सत्यशोधकीय कवी संमेलन : – रात्री ८ ते ९
अध्यक्ष – मा.सतीश जामोदकर ( मंगरूळपीर )
सुत्र संचालन – विक्रम कांबळे ( कर्जत ) , प्रास्ताविक – शाहिर भारत मुंजे ( चारठाना – जिंतूर ) आभार – मनिषा घोडके ( अहमदनगर )
———————————–
*विशेष सत्कार* : – दीनमित्रकार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार : – मा.नागेश दादा चौधरी ( बहुजन संघर्ष , नागपूर ), मा.सुकन्या शांता ( मंगलोर ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर उल्लेखनीय वकील पुरस्कार : – ॲड.दिशा वाडेकर ( दिल्ली ) , सत्यशोधक चळवळीचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार : – के.ई.हरिदास ( छत्रपती संभाजी नगर ), मा.ॲड.सुभाष निकम ( गेवराई )
* *ठराव वाचन* : – डॉ.डि.बी.शेंडे ( तळोदा ) विश्वस्त, सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य
* *कार्यक्रम पत्रिका – रविवार दि.१ डिसेंबर २०२४*
सत्र पहिले – सकाळी ९ ते ११ विषय : – भारतीय परंपरेचे अब्राह्मणी / अवैदिक प्रवाह अध्यक्ष : मा. डॉक्टर सुरेश झाल्टे , धुळे ( संस्थापक सचिव ,म.रा. सत्यशोधक समाज संघ )
वक्ते : – धर्मकीर्ती महाराज ( परभणी ), प्रा.डॉ. शेख एजाज ( सुफी साहित्याचे अभ्यासक , छत्रपती संभाजीनगर ), दादा महाराज पनवेलकर ( सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ ), प्रा.हंसराज जाधव ( पैठण, महानुभाव पंथाचे अभ्यासक ) , डॉ.शिरीष लांडगे ( नेवासा ), सुत्र संचालन – संतोष बनकर ( नगर ), प्रास्ताविक – बाळकृष्ण झोरे ( रत्नागिरी ),आभार गोविंद सुमन केशव ढाके ( पुणे )
सत्र दुसरे :- सकाळी ११ ते १
विषय : – महिलांची वर्तमान स्थिती : सत्यशोधकीय आकलन अध्यक्ष – प्रा. प्रतिमा परदेशी ( पुणे ) वक्ते : – डॉ.वंदना महाजन ( मुंबई ), डॉ .स्मिता पानसरे ( नेवासा ), सुनिता भोसले ( शिरूर ), जयश्री बागूल ( नाशिक ), सूत्रसंचालन वर्षा शिंदे ( श्रीगोंदा ), प्रास्ताविक निकिता जाधव ( छत्रपती संभाजीनगर ), आभार संध्या मेढे ( अहिल्यानगर )
भोजनावकाश – दुपारी १ ते २
सत्र तिसरे – दुपारी २ ते ४
विषय : – समकालीन शेती समस्या : सत्यशोधकांची भूमिका अध्यक्ष : मा. विश्वासराव पाटील,अमळनेर ( विश्वस्त / संयोजक सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ) वक्ते : – मा.अमर हबीब ( किसानपुत्र आंदोलन, अंबाजोगाई ),भारत पाटील ( कोल्हापूर ), डॉ. ज्ञानदेव राऊत ( लातूर ), ॲड.मोहनिश थोरात ( हायकोर्ट,औरंगाबाद ), सुत्र संचालन – संजय खराडे ( श्रीगोंदा ) , प्रास्ताविक – डॉ.सुनील जाधव ( परभणी ),आभार – डॉ. दत्ताजीराव जाधव ( सातारा )
*समारोपीय सत्रांत* : – सायंकाळी ४ वाजता
अध्यक्ष : – मा.उत्तमराव पाटील , तरवडी नेवासा ( स्वागताध्यक्ष – ४२ वे अधिवेशन अहिल्यानगर ) , प्रमुख पाहुणे – मा.डॉ.राजेंद्र कुंभार ( जयसिंगपूर ) , अतिथी व्याख्याते – सत्यशोधक किरण माने ( सुप्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक ) सुत्रसंचालन – डॉ.महेबूब सय्यद , प्रास्ताविक – रमेश सोनवणे , आभार – बहिरनाथ वाकळे
सत्यशोधक समाजाचा उज्ज्वल इतिहास तथा महात्मा फुले यांचे अलौकिक अमर दिपस्तंभासमान कार्य ,सत्यशोधक संघाचे कार्याबाबत मान्यवर लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख व विद्यमान कार्यकर्त्यांचा परिचय याचा दस्तावेज संघटित होण्याच्या दृष्टीने संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व संस्थापक सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे संमेलनाच्या औचित्याने स्मरणिका प्रकाशित करीत आहेत .
अधिवेशन ऐतिहासिक व्हावे तसेच नियोजनानुसार उत्कृष्ट कार्यवाही होऊन अधिवेशन संस्मरणीय होण्याच्या उद्दिष्टाने स्वागत समिती , संयोजन समिती , कार्य निष्पादन समिती , प्रसिद्धी समिती नियुक्त करण्यात आल्या आहेत.उपरोक्त समितींचे राज्यातील क्रियाशील सदस्य व अहिल्यानगरचे समस्त स्थानिक कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळी अन् समविचारी संघटनांचे कार्यकर्ते समर्पित भावनेने महिन्यापासून अध्यक्ष अरविंद खैरनार , सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे तसेच अधिवेशनाचे संयोजक ज्ञानदेव खराडे सर ( अहिल्यानगर ),कार्याध्यक्ष रमेश सोनवणे ( श्रीगोंदा ) यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत असे आमचे विशेष प्रतिनिधी तथा संमेलनाच्या प्रसिद्धी समितीचे सदस्य विजय लुल्हे ( समन्वयक ,सत्यशोधक समाज संघ जळगाव ) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्रातील तमाम फुले प्रेमी अभ्यासक,फुले प्रेमीजन,सत्यशोधकीय कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांच्या बंधु भगिनींनी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक अधिवेशनाला स्वतः तसेच समविचारी मित्रमंडळी व आप्तेष्टांसह बहुसंख्येने उपस्थित राहून अधिवेशनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार , संस्थापक सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे , विश्वस्त विश्वासराव पाटील अधिवेशनाचे संयोजक ज्ञानदेव खराडे सर कार्याध्यक्ष रमेश सोनवणे सर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *