विधानसभा निवडणुकित मॉडेल मतदान केंद्र सुशोभीकरण  आधार संस्था आणि विप्रो कंपनी यांचा पुढाकार
1 min read

विधानसभा निवडणुकित मॉडेल मतदान केंद्र सुशोभीकरण आधार संस्था आणि विप्रो कंपनी यांचा पुढाकार

Loading

विधानसभा निवडणुकित मॉडेल मतदान केंद्र सुशोभीकरण

आधार संस्था आणि विप्रो कंपनी यांचा पुढाकार

अमळनेर प्रतिनिधी –

अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार आहे. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 11 मतदान केंद्राचे मॉडर्न मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आधार संस्था आणि विप्रोने तीन मतदान केंद्र सुशोभीकरण कार्य उत्कृष्टपणे पार पाडली होती.

या विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी अमळनेर यांनी 11 मतदान केंद्राची मॉडेल मतदान केंद्र निश्चिती केली आहे. या विधानसभा निवडणुकीत
पाच मतदान केंद्र ज्यात तीन महिला ,एक युवक व दिव्यांग मतदान केंद्र सुशोभीकरण कार्यात सहभागी होण्यासाठी आधार व विप्रो कडे उपविभागीय अधिकारी, व तहसीलदार अमळनेर यांनी सोपवली आहे व आधार आणि विप्रो द्वारे सहभाग घेतला जाणार आहे.
यशस्वितेसाठी आधार संस्थेचे टीम मेंबर ,अश्विनी सूर्यवंशी, दीपक संदानशिव हे समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *