शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावतात तश्या सुविधाही द्या!* शुभांगी पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी….
![]()
*शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावतात तश्या सुविधाही द्या!*
शुभांगी पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी….
राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत व या निवडणुका योग्य रीतीने पार पडाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व कर्मचाऱ्यांची सेवा निवडणुकी साठी अधिग्रहित कऱण्यात येते.
निवडणूक सेवा हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने आमचे शिक्षक देखील मोठ्या आनंदाने इलेक्शन ड्युटी आपले कर्तव्य समजून काटेकोरपणे पार पाडत असतात. परंतु या कर्मचाऱ्यांची राहण्याची ,चहा पाणी, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करणे हे देखील निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाकडून स्थानिक प्रशासन म्हणजेच ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे या निवडणूक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नाश्त्याचे भोजनाची व्यवस्था सोपवली असते व त्यासाठी त्यांना निधी देखील देण्यात आलेला असतो. परंतु संबंधित स्थानिक प्रशासनाकडून याबाबत कुठलीही ठोस व्यवस्था केली जात नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाशी तापाशील वाऱ्यावर सोडण्यात येते. जर एखाद्या उमेदवाराने किंवा नेत्याने त्यांची व्यवस्था केली तरच त्यांना जेवण नाश्ता मिळतो. परंतु जर असे झाले नाही तर त्यांच्यावर त्या दिवशी उपाशीपोटी कर्तव्य बजावण्याची वेळ येते. नुकत्याच मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिक्षकांना या गोष्टीचा प्रत्यय आला असून काही बुथ वर 48- 48 तास या कर्मचाऱ्यांना साधे पाणी देखील कोणी विचारले नव्हते. आधीच कर्मचाऱ्यांवर निवडणूक योग्य रीतीने पार पाडण्याचा ताण – तणाव असतो. व त्यात त्यांना मतदानाच्या दिवशी ड्युटी सोडून कुठे बाहेर देखील जेवणासाठी जाता येत नाही व अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना वेळेवर चहा ,नाश्ता व जेवण मिळणे आवश्यक असते, परंतु याबाबत मागील काही निवडणुकांमध्ये अक्षम्य असे दुर्लक्ष केले जात असल्याने शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था नसल्याने उपाशी पोटी तणावाखाली २४ तास काम केल्याने अनेक शिक्षकांची प्रकृती बिघडल्याचे मागील निवडणुकीत पहावयास मिळाले आहे.
गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेमार्फत धुळे शहरात दिवसभर निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना स्वखर्चाने भोजनाची व नाष्टा ची व्यवस्था करण्यात आली होती.
तरी या वेळीं इलेक्शन ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची हेळसांड होऊ नये यासाठी
येत्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने वेळेवर चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्यासह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संभाजी राजपूत सर, बन्सीलाल खलाणे सर, वसीम सर, यश निकम, कुणाल पाटील आधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदरचे वृत्त फोटोसह आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध द्यावे ही नम्र विनंती
शुभांगी ताई पाटील
शिवसेना उपनेते तथा राज्याध्यक्ष महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन

