राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहिर…*
![]()
*राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहिर…*
दिनांक ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान जालना येथे होत असलेल्या सब ज्युनियर राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून जळगाव जिल्ह्याचा संघ जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी जाहीर केला. जळगाव येथे घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघातील खेळाडूंचे महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदिप तळवलकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार्थी किशोर चौधरी, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे,जिल्हा सेपक टकारो असोसिएशनचे सचिव प्रा.इकबाल मिर्झा, जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे गिरीश पाटील, प्रा.वसीम मिर्झा,नितीन पाटील यांनी स्वागत करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
*मुले संघ :* तेजस नितीन राऊत, पंकज प्रवीण गव्हाडे,सोहम विलास जाधव,सार्थक अजय पाटील,रामेश्वर गजेंद्र परीहार, ईशांत अविनाश शिंदे,सुमित विलास तायडे,निलेश अरुण भोई, चैतन्य लक्ष्मण बुंदले,रुपेश विजय पालवे,विवेक वासुदेव वाघ,तन्मय गणेश पाटील
*मुली संघ :* श्रद्धा श्रीराम शिंदे, मिताली गोपाल मिस्तरी, जानवी विनोद पाटील, सृष्टी सचिन जाधव,अनुष्का प्रमोद चौधरी, सृष्टी संदीप वाघ,खुशी आनंद लोखंडे,वैष्णवी विवेक महाजन ,जानवी प्रशांत सोनवणे, देवयानी अशोक शिंदे, प्राची पांडुरंग थोरात,भूमिका संदीप सोनार.
संघ व्यवस्थापक म्हणून श्री.गिरीश पाटील तर संघ प्रशिक्षक म्हणून मयुर चांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

