*महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना मत म्हणजे जुनी पेन्शन ला मत*,* महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन -डॉ अनिल शिंदे
![]()
*महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना मत म्हणजे जुनी पेन्शन ला मत……*
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन -डॉ अनिल शिंदे
अमळनेर प्रतिनिधी- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील 26000 कर्मचारी पेन्शन पीडित आहेत. याबाबत अनेक आंदोलन करण्यात आली.. महायुती सरकारने फक्त आश्वासन दिली.. समिती स्थापन करणे, त्यात वेळ घालत कोणत्याही प्रकारचा निर्णय केला नाही.. त्यामुळे महायुती सरकारच्या बाबत राज्य कर्मचारी वर्ग नाराज आहे..
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा घेतला आहे .त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागेल असे सुतोवाचक केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महाविकास आघाडी बद्दल सहानुभूती आहे..
26 हजार कर्मचारी त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या जुनी पेन्शन चा झाल्याने राज्यातील सर्व पेन्शन वेळेत कर्मचारी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहतील अशी सध्या चर्चा सुरू आहे..
अमळनेर तालुक्यामध्ये ही अनेक पेन्शनग्रस्त शिक्षक आहेत की जे पेन्शन पासून वंचित आहेत .अनेक वर्षापासून लढा दिला पण न्याय मिळाला नाही पण आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून संधी चालून आली आहे. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांना मत म्हणजे पेन्शनला मत अशी सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.. सर्व पेंशन पीडित कर्मचारी यांनी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून उमेदवारांना विधानसभेमध्ये पाठवावे व आपला प्रश्न जो कितीतरी वर्षापासून पेंडिंग आहे तो महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसातच हा पेन्शनचा मार्ग मोकळा होईल असे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांनी सांगितले…

