ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा
![]()
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा
केसी सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील बावस्कर यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मनीषा जयकर आणि वर्षा चौधरी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती मुलांना सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी *चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे का* या विषयावर
साई बारी, हेमंत पवार, वैभव चौधरी,मोहन भोळे,कुणाल भटकर,सार्थक पाटील,
चेतना काळुंखे, अनुष्का सोनवणे, लक्ष्मी सोनवणे, दामोदर चौधरी,विनित मखिजा,राज भदाणे या विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणासोबत संस्कार आणि कौशल्याची गरज आहे असे विद्यार्थ्यांनी मत मांडले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे , महेंद्र नेमाडे वेदप्रकाश गडदे रोहिणी पाटील सुचेता बावस्कर, शितल भंगाळे भक्ती बर्वे यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम कोल्हे यांनी केले तर आभार प्रतिभा लोहार यांनी मानले.

