लढलो- लढणार… माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी, युवकांच्या हितासाठी, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांचे विशेष पत्रकाची मतदारांमध्ये होते आहे चर्चा..
1 min read

लढलो- लढणार… माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी, युवकांच्या हितासाठी, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांचे विशेष पत्रकाची मतदारांमध्ये होते आहे चर्चा..

Loading

लढलो- लढणार… माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी, युवकांच्या हितासाठी, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी

अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या विशेष पत्रकाची  मतदारांमध्ये होत आहे चर्चा..

अमळनेर प्रतिनिधी- आपण आमच्या अमळनेर शहराच्या सर्वांगीन विकासासाठी एकत्र यायला हवे. या संदेशासोबत एक सप्रेम नमस्कार, माझ्या आदरणीय मायबाप जनते, युवक मित्र, माता-भगिनींनो!
2012 पासून तुम्ही मला दिलेल्या प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासामुळेच मी आजपर्यंत उभा आहे. तुमचा विश्वास, तुमचा सन्मान, आणि तुमची साथ ही माझी खरी ताकद आहे. गेल्या बारा वर्षांपासून मी या मतदारसंघाचा सेवेसाठी सदैव तत्पर राहिलो आहे.

*सर्वांगीण विकासाचा कटिबद्ध विचार*

अमळनेर हा शहराचा विकास करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याच्या अनुषंगाने, मी त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले.
शहराच्या प्रवेशद्वारावर संत सखाराम महाराज वाडी येथे भक्तनिवास, नवीन पोलीस वसाहत, नगरपरिषद इमारत आणि प्रभावशाली नाट्यमंदिर यासारख्या उपक्रमांना महत्त्व देण्यात आले आहे. जलसंपत्तीच्या दृष्टीने कलाली डोह योजना आणि पाणी पुरवठा व्यवस्थेतील सुधारणा यामुळे आमच्या शहरात जलटंचाईचा प्रश्न मिटवला गेला आहे.
मी चॉपडा रोड स्मशानभूमी आणि खर्डेश्वर येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण केले आहे. मागासवर्गीय मुलींसाठी वस्तीगृह आणि भाजीपाला मार्केट यासारख्या उपक्रमांमुळे स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे.

 

 

*कोरोना काळातील साहाय्य*

जागतिक कोरोना महामारीच्या काळात, मी स्वखर्चाने शहरातील निर्जंतुनीकरण केले, ज्यामुळे नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यात मदत झाली. गंभीर परिस्थितीत हवालदिल नागरिकांना औषधांचा पुरवठा करण्याचा मी प्रयत्न केला.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, माझ्या लोकांनी या आमदारकीसाठी दिलेला विश्वास हा माझ्या कार्याची प्रेरणा आहे. समाजातील सर्व घटकांद्वारे यश प्राप्त करण्यासाठी मी काटेकोरपणे कार्यरत राहील.

*भविष्यातील वचन*

आमळनेर माझी जन्मभूमी आहे आणि या भूमीचे ऋण फेडण्यासाठी तुमच्या मतदानाच्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे. शेतकरी, कष्टकरी, आणि तरुणांच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. हे आश्वासन नव्हे तर माझे वचन आहे.

**संपर्क साधा आणि एकत्र येऊन अमळनेरच्या उज्वल भविष्याची घडू या*

आपला हक्काचा माणूस,
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार
मा.आ. शिरीषदादा चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *