मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त  कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024,  सौ छाया संदिप पाटील   पोलीस पाटील   पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव
1 min read

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, सौ छाया संदिप पाटील पोलीस पाटील पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव

Loading

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त
कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024,

सौ छाया संदिप पाटील
पोलीस पाटील
पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव

शिक्षण
– आयटी डिप्लोमा (डॉ. बी. बी. ए. पॉलिथेनिक कॉलेज, सिल्वासा)
– बी.ई. संगणक (S.S.R. कॉलेज, सिल्वासा, D.N.H)

प्रमुख कामगिरी
पोलीस पाटील म्हणून जबाबदारी
सौ छाया संदिप पाटील यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस पाटील म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

अपराध नियंत्रण
नगरहून 18 लाखांची चोरी करून आलेल्या चोराला रात्री 9:00 PM ते 3:00 AM पर्यंत फॉरेस्टच्या जंगलात पोलीसांच्या टीमला पकडण्यासाठी त्यांनी महत्त्वाची मदत केली.

कृषी विमा गुन्हे
पिक विमा कंपनीच्या एजंटांनी शेतकऱ्यांकडून पिक पंचनाम्यासाठी प्रत्येक गटाकडून 500 रुपये घेतलेल्या गैरप्रकारांमध्ये त्यांनी कृषी विभागाला कळवून, पोलिसांच्या मदतीने रंगेहाथ एजंटांना पकडले. यामुळे शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत गोळा करून 39 शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

ग्रामस्थ वाद मिटवणे
गावात 15 ते 20 वर्षांपासून रखडलेले वाद शांतीपूर्वक मिटवून, त्यांनी गावात न्याय मिळवून दिला.

 

ठाम नेतृत्व
P. I. पवनकुमार देसले सरांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करताना, राजकारणी व गुंड लोकांच्या धमक्यांना तोंड देऊन कार्यरत राहण्याची तत्परता त्यांनी दाखवली आहे.
सौ छाया संदिप पाटील यांनी आपली कर्तृत्व गाथा ठरवली आहे, जे त्यांच्या कार्यशक्तीचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी मराठी लाईव्ह न्युजने 2024 साठी “कर्तृत्व गौरव पुरस्कार” देण्याचे ठरवले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *