कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024,  वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व-  डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे  ,साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर  क्षेत्र- वैद्यकीय
1 min read

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024, वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व- डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे ,साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर क्षेत्र- वैद्यकीय

Loading

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024

वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व-
डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे
साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर

क्षेत्र- वैद्यकीय

डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे यांचा जन्म बोरगाव, ता. अमळनेर येथे झाला आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण तेथेच घेतले. यानंतर, माध्यमिक शिक्षण मारवड उच्च माध्यमिक शाळेत आणि उच्च शिक्षण प्रताप कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यांनी पुढे उच्च एमबीबीएस शिक्षण प्रवरानगर येथे घेतल्यानंतर, डीएनबी मेडिसिन कलकत्ता येथे गोल्ड मेडल मिळवले आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीचे सदस्य बनले.
2012 च्या काळापासून, डॉ. शिंदे अमळनेरमध्ये साई सेवा हॉस्पिटल चालवित आहेत. त्यांच्या कुटुंबातील वातावरण शैक्षणिक होते, कारण त्यांच्या आई-वडील हे शिक्षक होते. पत्नी, डॉ. प्रियंका प्रशांत शिंदे, ह्या एमबीबीएस असून कान, नाक, घसा तज्ञ आहेत, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना त्यांना चांगली मदत मिळाली.
डॉ. प्रशांत शिंदे दरवर्षी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करतात. ते स्वतःची प्रसिद्धी न करता कार्य करत आहेत, जसे की गजानन परिवाराच्या माध्यमातून मुंदडा नगरमध्ये पायी वारीसाठी औषधांची किट देणे. त्यांचा मानस वडिलांच्या नावाने शिष्यवृत्ती चालू करण्याचा आहे, आणि सैन्याच्या कर्मचाऱ्यांना दवाखान्यात 50% सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.
कोविड-19च्या काळात त्यांनी ग्रामीण दवाखान्यात निशुल्क सेवा दिली आणि प्रताप महाविद्यालयातील रुग्णांची तपासणी केली. प्रताप शेटचे हॉस्पिटल बंद पडल्यामुळे ग्रामीण व गोरगरीब नागरिकांना आपल्याला आवश्यक वैद्यकीय सेवा मिळवण्यात अडचणी येत आहेत. डॉ. शिंदे यांच्या साठी कार्य करणार आहेत..

 

भविष्यात एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी निशुल्क वैद्यकीय सेवा देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या आदर्शांमध्ये आचार्य अत्रे यांचा समावेश आहे, ज्याने त्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांनी आचार्य अत्रे यांचे अनेक पुस्तक वाचले आहेत, त्यात “मृत्युंजय” देखील आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी भेट घेऊन त्यांनी त्यांच्या कार्याने प्रभावित झाले.
डॉ. प्रशांत शिंदे यांच्या उत्कृष्ट सेवा कार्याचा सन्मान व्हावा म्हणून मराठी लाईव्ह न्युजने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘कर्तृत्व गौरव’ पुरस्काराने त्यांचा सन्मानित करण्याचे ठरवले आहे.
त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *