मा. आमदार शिरीष चौधरी यांचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज सादर करतांना तालुक्यातील मित्रपरिवारांची मोठी गर्दी
![]()
मा. आमदार शिरीष चौधरी यांचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
अमळनेर प्रतिनिधी – माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर करताना मित्र परिवाराची व अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून मोठी गर्दी पाहायला मिळाली.

सकाळी, शिरीषदादा चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी यांनी दादांचे औक्षण केले. नंतर सकाळी दहा वाजता सखाराम महाराजांचे आशीर्वाद घेत वाडी संस्थानपासून वाजत गाजत मित्र परिवार आणि अमळनेर तालुक्यातील अनेक समाज बांधव, कार्यकर्ते, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक 2024 च्या उमेदवारी अर्ज जोण्यासाठी शिरीषदादा चौधरी यांच्या मित्र परिवाराकडून तुफान गर्दी झाली. हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी यांनी यावेळी सांगितले की, “शिरीषदादा मित्र परिवारावर तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याबाबत दाखवलेला विश्वास कधीही तळाला जाऊ देणार नाही.”
उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या कडे सादर करतांना मा. आमदार शिरीषदादा चौधरी, सौ. अनिता चौधरी, डॉ. रवींद्र चौधरी, आणि माजी नगरसेवक यांच्यासह शिरीष दादा मित्र परिवारातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरीषदादा चौधरींच्या उमेदवारीसाठी समाजातील असंख्य लोकांचा पाठिंबा दर्शवला गेला आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांचे स्थान निश्चित करणे अधिक सोप्पे होईल अशी चर्चा आहे.


